प्रसंगी तुरूंगवास पत्करेन पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाला भीक घालणार नाही - धैर्यशील मोहिते पाटील

सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी प्रसंगी तुरूंगात जाण्याची तयारी आहे, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला

Shruti Patil
  • May 2 2024 8:20AM

सोलापूर: माळशिरस तालुक्याला दशहत, गुंडगिरीपासून भयमुक्त करू, असे इशारावजा विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यास माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कोणी कितीही दबाव आणला तरी आपण त्यास भीक घालणार नाही. घाबरणार नाही. मी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा नातू आहे. मतदारसंघातील मोहिते - पाटील कुटुंबीयांवर प्रेम करणारी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांसाठी प्रसंगी तुरूंगात जाण्याची तयारी आहे, असा इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार