हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा - योगी आदित्यनाथ

सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी कर्णिक नगराजवळील लिंगराज वल्याळ मैदानावर आयोजित जाहीर सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते.

Shruti Patil
  • May 2 2024 8:30AM

सोलापूर: सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी कर्णिक नगराजवळील लिंगराज वल्याळ मैदानावर आयोजित जाहीर सभेत योगी आदित्यनाथ बोलत होते. गेल्या सोमवारी, २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतर तिसऱ्याच दिवशी कट्टर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगी आदित्यनाथ यांची सभा झाली.

 
हिंदू आस्थांचा अवमान, भ्रष्टाचार आणि दहशतवादाचे मूळ काँग्रेस आहे. याच काँग्रेसकडून जातीच्या जनगणनेच्या नावाखाली हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना २७ टक्के आरक्षणातून ६ टक्के आरक्षण देण्याचा मनसुबा रचला जात आहे. वरून पुन्हा दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार