आदिवासी विकासाचा निधी आदिवासी विकास कामांसाठीच वापरा:आमदार आमश्या पाडवी

जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य यंत्रणेची उदासीनता.....

Sudarshan MH
  • Aug 7 2023 5:21PM




रस्त्याची दुरवस्था;जीवघेणा प्रवास....

अवैध व्यवसायाचे अक्कलकुवा, नवापूर हॉटस्पॉट.....

तळोदा प्रतिनिधी (राहुल शिवदे)

     राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आदिवासी जिल्हा नंदुरबार दुर्लक्षित असल्याचे नेहमी बोलले जाते,त्यात अक्कलकुवा सारख्या दऱ्या-खोऱ्यात वसणाऱ्या दुर्गम तालुक्याला मूलभूत सुविधापासुन वंचित ठेवण्याचे काम सरकार करत आहे,अक्कलकुवा तालुक्यात अद्यापही दर्जेदार रस्ते नाही.येथील आदिवासी समाज पायवाटेने रहदारी करतो,आरोग्य सुविधा पासून वंचित राहतो,सरकार आदिवासी विकासाचा निधी इतर विभागात वर्ग होतो ज्यामुळे आदिवासी विकासा पासून वंचित राहत आहे.तसेच अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील एका मुलीवर अत्याचार करून जीवेठार केल्या घटना त्याप्रकरणात तेथील आरोग्य विभागाची उदासीनता व पोलिसांकडून होणारी ढवळाढवळ,तसेच गुन्हेगारींच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ,अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालून खुली सूट देण्याचे काम पोलिसांकडून होत असल्याचा घणाघात आरोप विधान परिषदेचे सदस्य तथा आमदार आमश्या पाडवी यांनी विधानपरिषदेच्या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विविध मुद्दे सभागृहात मांडले.
      विधान परिषदेचे सदस्य तथा आमदार आमश्या पाडवी यांनी  गुरुवारी (ता.०३) जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात मोलगी (ता.अक्कलकुवा) येथील अल्पवयीन मुलीवर अत्यावर व जीवेठार केल्या प्रकरणी आरोग्य  विभाग व पोलीस अधिकाऱ्यांची उदासीनता तसेच जिल्ह्यात सर्रास सुरू असलेले अवैध धंदे यांना पोलीस अधिकाऱ्यांनी खुली सूट दिल्याने अवैध धंदे करऱ्यांना बळ मिळाले आहे.
ज्यामुळे गुन्हेगारीच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे मत मांडले.नंदुरबार जिल्ह्याला गुजरात व मध्यप्रदेश राज्याची सीमा जुळते,गुजरात राज्यात मद्यविक्रीवर बंदी असल्याने महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील मद्याची मोठ्या प्रमाणात मागणी असते.अशा मागणीला पूर्ण करण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील मद्याची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व नवापूर तालुक्यातुन जाणाऱ्या मार्गातून तस्करी होते.तसेच अनेक अवैध व्यवसाय फोफावले असल्याचे मत व्यक्त केले.
    
        दरम्यान नंदुरबार जिह्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे स्थानिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो तर अनेक ठिकाणी रस्ता नसल्याने पायवाटेने रहदारी करावी लागते,प्रसूतीसाठी रुग्णालयात नेताना अनेक गरोदरमाता रस्त्याच्या दुरावस्थेमुळे रस्त्यातच प्रसूती होते त्यामुळे अनेक वेळा बालक किंवा मातेला आपला जीव गमवावा लागला आहे.आरोग्य विभागाची देखील दुर्गम भागाकडे उदासीनता दिसून येते,कुपोषणावर प्रखरपणे लक्ष दिले जात नाही त्यामुळे आदिवासीच्या जीवनाचा  सरकारला मोलच नाही असे मत आमदार आमश्या पाडवी यांनी सभागृहात मांडले.तसेच आदिवासी जमीन हस्तांतरण बंदी कायदा असतांना आदिवासीची जमीनीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.ज्याकडे शासनाने देखील दुर्लक्ष केले आहे.आदिवासीची होत असलेली विक्री थांबवून कायद्याची ठोस अंमलबजावणी करण्यात यावी,जिल्ह्यातील धरणाचे पाणी आदिवासीच्या शेतीसाठी द्यावे,आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळावी,आदिवासी विकासाचा निधी आदिवासीच्या विकास कामांसाठीच वापर जावा इतर विभागात वर्ग करू नये अशा विविध मागण्या आमदार पाडवी यांनी सभागृहात मांडत सभागृहातचे लक्ष वेधले.

अवैध व्यवसाय थांबले पाहिजेल:आ.आमश्या पाडवी

नंदुरबार जिल्ह्यात सीमावर्ती भागातील अक्कलकुवा,नवापूर या तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, त्या व्यावसायिकांना पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याने अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू असल्याचे दिसून येते,या अवैध व्यवसायांना बंद करून कायदा व सुव्यवस्था अमलात आणावी असे मत आमदार आमश्या पाडवी यांनी सभागृहात मांडले.

प्रमुख मागण्या...

१)आदिवासी विकास विभागाचा निधी इतर विभागाला वर्ग न करता आदिवासीच्या विकास कामासाठी वापर करावा.
२)नंदूरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक दुर्घटना होत आहे.ज्यामुळे जीवितहानी होते,त्यावर उपाययोजना करावी.
३)आरोग्य विभागाने आदिवासी भागात लक्ष द्यावे,विशेषतः कुपोषण.
४)जिल्ह्यातील धरणांचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे,जेणेकरून आदिवासींची शेतीही हिरवळ होईल.
५)आदिवासी जमीन हस्तांतरित बंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी.
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार