अभिनव विद्यालय परिसरातून मोटारसायकलची चोरी

मोटारसायकलची चोरी

Sudarshan MH
  • Sep 18 2023 10:55AM
नंदुरबार शहरातील अभिनव विद्यालय परिसरातून भूषण रामकृष्ण मिस्तरी यांची मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली आहे याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त पोलीस माहितीनुसार नंदुरबार शहरातील गांधीनगर भागातील शिक्षक भूषण रामकृष्ण मिस्तरी यांनी आपली मोटार सायकल क्रमांक एम एच 39 एच 0075 ही शहरातील अभिनव विद्यालयाच्या पार्किंग परिसरात उभी केली होती शिक्षक भूषण मिस्तरी हे शाळेत अध्यापनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेत ती मोटरसायकल तेथून चोरून नेल्याची घटना घडली आहे याप्रकरणी दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शिक्षक भूषण रामकृष्ण मिस्तरी राहणार गांधीनगर नंदुरबार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 प्रमाणे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास जमादार सादिक शेख करीत आहे 
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार